ठाणे (प्रतिनिधी) - कैसे हराया? या वक्तव्याने प्रसिद्धी झोतात आलेल्या ठाणे महापालिकेच्या एमआयएमच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र कोकण भवन येथे जात पडताळणी समितीकडे चौकशीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांनी माहिती दिली असली तरी या प्रकरणाला आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असलेल्या सहर शेख यांचे वडील युनूस शेख गुरुवारी अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांशी काही मिनिटे चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत "करारा जवाब मिलेगा, दोन दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू," असा इशारा दिला आहे.
ठाण्यातील मुंब्रा परिसरातील एम आय एम च्या तरुण नगरसेविका सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार मुंब्रा येथील सिद्दिकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनिस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरितांसाठी 'नमुना 10' लागू असताना, युनिस शेख यांनी 'नमुना 8' चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवला. असा आरोप सिद्दिकी अहमद यांनी दाखल ठाणे तहसीलदार कार्यालयात दाखल केला होता याप्रकरणी तहसीलदारांनी गोपनीय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला त्यानुसार पाटील यांनी कोकण विभाग जात समिती कोकण भवन येथे योग्य चौकशी साठी मागील आठवड्यात अहवाल पाठवण्यात आला. याप्रकरणी जत समितीकडून योग्य चौकशी होऊन जात प्रमाणपत्र खरे का खोटे याची माहिती प्रांत झाल्यावर पुढील कार्यवाही होईल असे उपविभागीय अधिकारी पाटील यांनी सांगितले




















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.