संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे पुरक सडा येथील जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, द्रौपदी पांडुरंग पडवळ (वय ७५, रा. कोळंबे भरणकरवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. द्रौपदी पडवळ यांना विसरभोळेपणाचा आजार होता. याच आजारामुळे त्या ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. अखेर ३१ मार्च रोजीच संगमेश्वर पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार (रजि. नं. ०७/२०२६) दाखल करण्यात आली होता पोलीस आणि नातेवाईक गेल्या १५ दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कोळंबे पुरक सडा या जंगलमय भागातील झाडीझुडपांमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती समोर आली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो मृतदेह बेपत्ता असलेल्या द्रौपदी पडवळ यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
दीर्घ काळ उलटल्यामुळे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. विसरभोळेपणा मुळे जंगलात वाट चुकल्याने किंवा अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात अमृ. क्रमांक १६/२०२६ (BNS 194 प्रमाणे) नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. १५ दिवस बेपत्ता असलेल्या महिलेचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कोळंबे परिसरात शोककळा पसरली आहे.




1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.