loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडणे पडले महागात; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडून शिवीगाळ करणाऱ्या कसळखंड येथील स्वप्नील गायकर नावाच्या व्यक्तीस पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पनवेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीची मतदान मोजणी पनवेल शहरातील व्हीके हायस्कूल केंद्रावर सुरू होती. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी केली होती. तसेच भाजपच्या उमेदवारांचा विजय होत असल्याने मोठ्या प्रमाणात गुलाल उधळण सुरू होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अनेकांनी फलक फडकवले. यावेळी कशी जिरवली पुन्हा भेटू २०३१ च्या निवडणुकीत अशा स्वरूपाचा असलेला आक्षेपार्ह फलक पोलिसांनी जप्त करत ताब्यात घेतला. यावेळी घोषणा देगाऱ्या स्वप्निल गायकर यास पोलिसांनी घोषणा देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांसोबत हुजत घालण्यास सुरुवात केली. मात्र गायकर हा एवढ्यावरच न थांबता त्याने यावेळी खारघर येथील पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांची कॉलर धरून त्यांना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्वप्निल गायकर याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात बीएनएस कलम १३२, ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg