loader
Breaking News
Breaking News
Foto

इंधन दरवाढीचा असाही फटका ,मुंबईसह राज्यात भाजी महागली

मुंबई, नवीमुंबईसह महानगर क्षेत्रात भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी आवक 20 ते 30 टक्क्यांनी घटल्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसून येत आहे. सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, आठवड्याभरापूर्वी 130-170 रुपयांच्या दरम्यान असलेले फ्रेंच बीन्स आता 200 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. हिरव्या मिरचीने 150 रुपयांची पातळी गाठली असून, टोमॅटोचे दरही 25 रुपयांवरून थेट दुपटीने वाढत 50-60 रुपयांवर गेले आहेत. कोथिंबिरीची जुडी 60 रुपयांना विकली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या जागतिक राजकारणामुळे आणि सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्राइल युद्धामुळे याचा थेट फटका इंधनावर होत आहे. अनेक जहाजे इराणच्या होर्मुजच्या तिथे अडकल्या आहेत. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच भारतालाही इंधन दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. आता इंधन दरवाढ झाल्याने याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या स्वयंपाकघरातही पाहायला मिळत आहे. गॅसची टंचाईसोबतच आता भाजीपालाही महागला असल्याची माहिती समोर आली आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम हा दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या गोष्टींवर होतो. याचे कारण म्हणजे फळ आणि भाज्यांना शेतांमधून मंडीपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची गरज असते आणि या वाहतुकीसाठी पेट्रोल आणि डिझेलची गरज असेट. आता इंधनच महागले म्हटल्यावर भाज्यांची किंमतही वाढणार. भाजीपाल्यांसोबतच दूध आणि इतर डेअरी प्रोडक्टसवरही याचा परिणाम होऊ शकतो. इथेही दुधाची वाहतूक आलीच, त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाले तर सध्याच्या परिस्थितीचा फटका आता थेट आपल्या स्वयंपाकघरात जाणवायला लागला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सध्याच्या परिस्थितीचा फटका आता थेट आपल्या स्वयंपाकघरात जाणवायला लागलाय

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg