loader
Breaking News
Breaking News
Foto

अवैध खनिज उत्खननबाबत दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, सासोली, आडाळी, कुंब्रल, इतर गावात मोठया प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन तसेच डोंगर कापणी सुरू आहे. या अवैध वाहतूक विरोधात दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल सरपंच जनार्दन गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विलास सावळ, ठाकरे सेना पदाधिकारी गणेश धुरी, मिलिंद नाईक, तसेच सूर्याजी नांगरे, नवसो कदम यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथील नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. तातडीने कारवाई झाली नाही तर २३ एप्रिल रोजी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय समोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. इकोसेन्सीव्ह लागू असलेल्या कुंब्रल, कोलझर, तसेच आडाळी, सासोली येथे सामाईक जमीनीत तसेच आडाळी औद्योगिक विकास क्षेत्रात काही मायनिंग दलाल मंडळी यांनी धुमाकूळ घातला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg