loader
Breaking News
Breaking News
Foto

भरउन्हात सावलीला झाड मिळेना..

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सध्या उष्णतेचे प्रमाण खूप वाढले आहे. अंगाची लाही लाही होत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे थकलेल्या माणसाला विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा माळरानावर झाडेच शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे हवा नाहीच फक्त रणरणते ऊन.. या उन्हातून माणसांना जावे लागत आहे. बेसुमार झालेली वृक्ष तोडीमुळे डोंगर, माळराने उजाड झाली आहेत. त्यामुळे निसर्गामध्येही दिवसागणित बदल झाला आहे. वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. मात्र संबंधित अधिकारी यांना याचे गांभीर्य नाही. वृक्ष संवर्धनापेक्षा वृक्ष तोडीवर अधिक भर असून वृक्ष तोडीबाबतच्या वन कायद्याची अंमलबजावणी झाली तरच वृक्ष तोडीळा आळा बसेल असे निसर्गप्रेमीतून बोलले जात असून कायद्याची मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वृक्ष तोडलेल्या जागेवर दुप्पट झाडे लावायची, तसा वृक्ष तोडीचा परवाना देताना संबंधित खात्याकडून नियम आणि अटी शिवाय परवाना दिला जात नाही. मात्र तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी झाडे लावली जातात का? त्या झाडांचे वृक्ष संवर्धन होत आहे का? हा संशोधनाचा विषय बनला असून संबंधित अधिकारी वर्गाकडून खबरदारी घेताना दिसून येत नाही. म्हणून निसर्गाचा समतोल ढासळला आहे. याला कारणीभूत वृक्षतोड हेच कारण असल्याचे बोलले जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरी करणाच्या कामामुळे भली मोठी महाकाय वृक्ष तोडण्यात आली. रस्त्याची शोभा वाढवणा-या झाडांमुळे वाहन धारकांसह पादचारी यांना गारवा मिळत होता तो ही गेला. आता एखादे मोठे झाड दिसणे दुर्मिळ झाले आहे. वृक्ष तोडीमुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले असून पक्ष्यांच्या विसाव्यांचे ठिकाणेही नष्ट झाली आहेत. पर्यावरणाचा समतोल ही ढासळला आहे. हे सर्व थांबवण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी वृक्ष तोडीसंदर्भातील महाराष्ट्र १९१५ चा वनकायदा लागू करण्यात आला तरच वृक्ष तोडीला आळा बसेल, असे निसर्गप्रेमीतून बोलले जात आहे. याबाबत संबंधित विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष न दिल्यास निसर्गप्रेमीतून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg