loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीकरांनो, सावधान! जिल्ह्यात यलो अलर्ट; प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन

रत्नागिरी – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यासाठी येत्या तीन दिवसांकरिता म्हणजेच २७/१०/२०२५ ते २९/१०/२०२५ या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना जीवनावश्यक आणि मालमत्तेची काळजी घेण्याचे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास घराबाहेर पडणे टाळावे. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही यांसारखी सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवून ती विद्युत स्त्रोतांपासून (प्लग्जमधून) अलग करावीत. तसेच, दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीचा वापरही टाळणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, परंतु जर बाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी तात्काळ आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे आणि विशेषतः उंच झाडाखाली आश्रय घेऊ नये. जर एखाद्या मोकळ्या परिसरात असाल, तर गुडघ्यांमध्ये डोके घालून वाकून बसावे आणि धातूच्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे. आकाशात विजा चमकत असताना घरातील लँडलाईन फोनचा वापरही करू नये. वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळवण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘दामिनी APP’ (Damini App) डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टाइम्स स्पेशल

हवामानाची अधिकृत माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावरून घ्यावी. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये. मिळालेल्या प्रत्येक बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घेण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी: ०२३५२-२२६२४८ / २२२२३३ (व्हाट्सॲप: ७०५७२२२२३३) जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष: ०२३५२-२२२२२२, पोलीस टोल फ्री हेल्पलाईन: ११२ जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी: ०२३५२-२२२३६३ महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष: ७८७५७६५०१८ तहसील कार्यालय रत्नागिरी: ०२३५२-२२३१२७ तहसील कार्यालय लांजा: ०२३५१ – २३००२४ तहसील कार्यालय राजापूर: ०२३५३-२२२२३०२७ तहसील कार्यालय संगमेश्वर: ०२३५४-२६००२४ तहसील कार्यालय चिपळूण: ०२३५५-२५२०४४/९६७३२५२०४४ तहसील कार्यालय खेड: ०२३५६-२६३०३१ तहसील कार्यालय दापोली: ०२३५८-२८२०३६ तहसील कार्यालय गुहागर: ०२३५९-२४०२३७ तहसील कार्यालय मंडणगड: ०२३५०-२२५२३६ हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg