loader
Breaking News
Breaking News
Foto

हुपरी ते श्रीक्षेत्र गणपतीपुळे पायी दिंडी

रत्नागिरी - कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी-हातकणंगले या गावातून गेली १७ वर्षे श्री क्षेत्र गणपतीपुळेसाठी पायी दिंडी काढली जाते. देवाच्या दर्शनाला जायचे तर पायी जाण्याचा आनंद काय असतो? याची अनुभूती या दिंडीत मिळते. श्रद्धा, चिकाटी व व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या पायी दिडीचा उद्देश आहे. यंदा देखील श्री वरदविनायक चॅरिटेबल ट्रस्ट हुपरीच्यावतीने २५ ऑक्टोबर रोजी पायी दिंडी हुपरी गावातील श्री गणरायाचे दर्शन घेऊन निघाली. या पायी दिंडीचे आगमन आज रत्नागिरीत झाले. दैनिक रत्नागिरी टाइम्सतर्फे दरवर्षी या पायी दिंडीच्या यात्रेकरुंचे व श्री भक्तांचे स्वागत केले जाते. आज देखील रत्नागिरीत पोहचण्याआधी त्यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्सकडे संपर्क साधला. त्यानंतर देवाच्या दर्शनाला निघालेल्या हुपरी ते गणपतीपुळे पायी दिंडीचे महत्त्व पदाधिकार्‍यांनी सांगितले. या पायी दिंडीत अतुल जाधव, महेश देवाळे, प्रकाश बावचे, अमेय जाधव, सुनिल शेट्ये, विठ्ठल खैरे, तानाजी जाधव, स्वप्नील खेमलापुरे, सचिन मुधाळे आदी सहभागी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg