loader
Breaking News
Breaking News
Foto

कार्तिक एकादशीनिमित्त कासार्डे ते पंढरपूर एस.टी.बसचा शुभारंभ

कणकवली 28 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)- कासार्डे, ओटव, असलदे,आयनल येथील वारकरी एकत्र येत १९८५ पासूनची अखंड परंपरा राखत कार्तिकी एकादशीनिमित्त मंगळवारी सकाळी एस.टी.बसने पंढरपूरकडे रवाना झाले. गेली ४० वर्षाची परंपरा कायम राखत यावर्षी पुन्हा एकदा पंढरपूरला जायला मिळत असल्याने सर्व वारकऱ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान या वारकऱ्यांची एस.टी.बस मार्गस्थ होताना जेष्ठ वारकरी श्रीधर पाताडे याच्या हस्ते श्रीफळ वाढवून वारीच्या एस.टीच्या प्रस्थानाचा शुभारंभ केला. यावेळी सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,माजी सरपंच संतोष पारकर,ग्रा.पं. सदस्य सहदेव उर्फ आण्णा खाडये, जेष्ठ वारकरी रामचंद्र नकाशे,अजित नकाशे, विनायक नकाशे, सुहास नकाशे,संतोष पेडणेकर,सुरेश परब,सत्यवान मेस्त्री व एस.टी. चालक, वाहक याच्यासह वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.गेली ४० वर्षाची परंपरा असणा-या या वारीच्या सुरवातीला ओटव,असलदे, आयनल, कासार्डे परीसरातून वारकरी एकत्र करत श्री.रामचंद्र नकाशे,कै. कृष्णा सरवणकर, श्री लोके गुरूजी यानी पुढाकार घेऊन ही वारी सुरू केली होती.आता हीच वारी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी नित्यनियमाने आजही सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान एस.टी. कर्मचारी संपावर असताना विठूरायांच्या भेटीसाठी याच सर्व वारकऱ्यांनी खाजगी वाहनाने पंढरी गाठली होती.याचबरोबर सध्या जिल्हातील अनेक भागातून वारकरी पायी,एस.टी.बस सह खाजगी वाहनाने पंढरपूरात दाखल होण्यासाठी निघाले आहेत.या वारक-यांसाठी माजी सरपंच संतोष पारकर,सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,आण्णा खाड्ये याच्याकडून अल्पोपहार व पाणी बाॅटलची व्यवस्था करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg