loader
Breaking News
Breaking News
Foto

31 ऑक्टोबरपासून श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थान कोंडवी-चिंद्रवलीच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात!

रत्नागिरी :- प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थान कोंडवी-चिंद्रवलीचा वार्षिक उत्सव कार्तिक शुद्ध दशमी बुधवार दि. 31 ऑक्टोबर 2025 ते कार्तिक वद्य प्रतिपदा मंगळवार दि. 06 नोव्हेंबर 2025 पर्यंत साजरा होणार आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार, मित्रमंडळींसाह उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे  अध्यक्ष श्री. सतिश मुळ्ये यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रम - शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर 2025, सकाळी 8.00 वा. श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक, रात्री 9.30 ते 1.00 आरती, भोवत्या व ह.भ.प. श्री. यश सोहनी यांचे कीर्तन. शनिवार  दि. 1 नोव्हेंबर 2025  (स्मार्त एकादशी), सकाळी 8.00 वा. श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक व धार्मिक विधी, सायं. 4.30 वा. भजन, रात्री 9.30 ते 1.00 आरती, भोवत्या, दिंडी व ह.भ.प. श्री. यश सोहनी यांचे कीर्तन.. रविवार  दि. 2 नोव्हेंबर 2025  (भागवत एकादशी), सकाळी 8.00 वा. श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक व धार्मिक विधी, सायं. 4.30 वा. भजन, रात्री 9.30 ते 1.00 आरती, भोवत्या, दिंडी व ह.भ.प. श्री. यश सोहनी यांचे कीर्तन.. सोमवार दि. 3 नोव्हेंबर 2025, सकाळी 8.00 वा. श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक, रात्री 9.30 ते 1.00 आरती, भोवत्या व ह.भ.प. श्री. यश सोहनी यांचे कीर्तन. मंगळवार दि. 4 नोव्हेंबर 2025 (वैकुंठ चतुर्दशी), सकाळी 8.00 वा. श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक, रात्री 9.30 ते 1.00 आरती, भोवत्या व ह.भ.प. श्री. यश सोहनी यांचे कीर्तन व तीर्थप्रसाद. बुधवार दि. 5 नोव्हेंबर 2025 सकाळी 8.00 वा. श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक, दु. 2 वा. ह.भ.प. श्री. विश्वनाथ भाट्ये यांचे कीर्तन, बाळगोपाळांचे खेळ, दहीकाला, भोवत्या व गंगास्नान, सायं. 7 ते 9 आरती, भोवत्या. रात्री 10.30 वा. मंगलाचरण, रात्री 11 वा. नाट्यप्रयोग : श्रीरंग रत्नागिरी निर्मित 2 अंकी कॉमेडी नाटक "यू आर ग्रेट पप्पा" , दिग्दर्शक : श्री. भाग्येश खरे, कलाकार: पल्लवी गोडसे, सोनल शेवडे, सारा काळे, अथर्व करमरकर, चिन्मय दामले व गोपाळ जोशी आणि ह.भ.प. श्री. यश सोहनी यांचे लळीताचे किर्तन. गुरुवार  दि. 06 नोव्हेंबर 2025, स. 11 ते 2 श्रीसत्यनारायण पूजा व महाप्रसाद.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg