loader
Breaking News
Breaking News
Foto

साळीस्ते खून प्रकरणातील संशयित आरोपीना सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतले ताब्यात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - तिलारी पुलाच्या बाजूला सापडून आलेली रक्तरंजित कार तसेच साळीस्ते कणकवली येथे डॉ. श्रीनिवास रेड्डी याचा मृतदेह दोन्ही घटना रक्तरंजित कार खूनाशी जुळल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यंत्रणा यांनी आपले काम चोख पणे बजावून या खून प्रकरणातील तीन संशयित आरोपी याना गजाआड करून त्यांना सिंधुदुर्ग कडे घेऊन पोलीस पथक निघाले आहे. प्राॅपटिच्या वादातून हा खून झाला असा निकष पोलिसांनी काढला आहे. तरी या खुनामागील बरीच माहिती आता उघडकीस येणार आहे. मृतदेह साळीस्ते तर जवळपास १३० किलोमीटर अंतरावर कार ढकलून देणे या अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर तिलारी पुलाच्या बाजूला झाडीत नंबर प्लेट नसलेली तसेच रक्ताने माखलेली कार आढळून आली होती. तर दुसऱ्या दिवशी साळीस्ते कणकवली येथे खून करण्यात आलेला अनोळखी मृतदेह आढळून आला होता यामुळे खळबळ उडाली होती. मृतदेह हा बेंगलोर कर्नाटक येथील डॉ श्रीनिवास रेड्डी तर कार तिच्या आईच्या नावाने आंध्र प्रदेश रजिस्टर असल्याचे स्पष्ट झाले होते. डॉ. श्रीनिवास रेड्डी त्याची आई या डाॅक्टर होत्या बेंगलोर मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची मालमत्ता आहे हे समोर आले होते यातून हा खून झाला असावा असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग कणकवली पोलीस तसेच एल सी बी पथक गेले पाच दिवस बेंगलोर कर्नाटक येथे खून प्रकरणातील आरोपी यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. यातील तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात मिळाले आहेत. कर्नाटक पोलीस यांचे सहकार्य लाभले. सोमवारी रात्री तीन जणांना ताब्यात घेऊन ते निघाले आहेत. यामुळे या प्रोफाईल खून प्रकरणातील बरीच माहिती आता उघड होणार आहे. मृतदेह साळीस्ते येथे तर कार तिलारी पुलाच्या बाजूला कशी टाकली. येथून ते दुसऱ्या वाहनाने प्रसार झाले. यासाठी कुणी मदत केली बरीच माहिती पुढे येणार आहे. अखेर सिंधुदुर्ग पोलीस अधिकारी यांनी प्रंचड मेहनत घेऊन आरोपींना गजाआड केले हे कौतुकास्पद आहे.

टाइम्स स्पेशल

महामार्गालगत साळीस्ते येथे श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह आढळला होता. त्याच दिवशी रेड्डी यांच्या आईच्या नावे असलेली कार दोडामार्ग परिसरात सापडली. कारमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने ही दोन्ही प्रकरणे परस्परांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.या धागेदोऱ्यांवरून एलसीबी आणि कणकवली पोलिसांनी बेंगलोर गाठले आणि तीन दिवसांच्या गुप्त तपासानंतर सोमवारी रात्री संशयितांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून ‘प्रॉपर्टी वादातूनच खुनाचा डाव आखला गेला’ असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रेड्डी यांचा खून साळीस्ते परिसरातच करण्यात आला असावा, त्यानंतर मृतदेह त्याच ठिकाणी फेकून आरोपींनी त्यांची कार दोडामार्ग येथे सोडून दिली व पसार झाले, अशी प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे. एलसीबीचे अधिकारी आणि कणकवली पोलिस आता आरोपींकडून चौकशी सुरू करणार असून, पुढील काही तासांत या खुनामागील खरे कारण आणि मुख्य सूत्रधार उघडकीस येण्याची शक्यता आहे.सिंधुदुर्ग पोलिसांनी या तपासात दाखवलेली तत्परता आणि वेगवान कारवाई सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg