loader
Breaking News
Breaking News
Foto

वन विभाग सुस्तावले! पोलिसांनी पकडला खैराची अनधिकृत वाहतूक करणारा टेम्पो

संगलट (खेड )(प्रतिनिधी) - महाड तालुक्यात खैराचे अनधिकृतपणे वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून वन खात्याने याबाबत दक्ष राहणे गरजेचे असताना महाड शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अनधिकृत खैराची वाहतूक करणारी वाहन पकडून वनखात्याच्या ताब्यात दिल्याने वनखाते सुस्तावल्याची चर्चा महाड तालुक्यात चर्चिली जाऊ लागली आहे. महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खेडोपाडी खैराच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे उघड झाले असून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पणे खैराची वाहतूक होत असताना वन खात्याने कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी वाहन पकडल्याने त्याबद्दल उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाड शहराजवळील शिरगाव नाक्यावर पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये MH. १२. FD.५९०३ या क्रमांकाची महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप मध्यरात्री महाड शहर पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये शिरगाव तपासणी नाक्यावर आढळली यामध्ये खैराचे सोलीव नग १९६., १.७९२ घनमीटर २७४०३. रुपये किंमत असलेला व वाहनाची किंमत ३,५०,००० असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व ही बोलेरो जीप वन खात्याच्या ताब्यात दिली. खैराची अनधिकृतपणे वाहतूक करणारे आकाश पुंडलिक पडळघरे व वाहन चालक / मालक देविदास शिवाजी पडळघरे राहणार मुक्काम पोस्ट रिहे. पडळ घर वाडी तालुका, मुळशी जिल्हा पुणे येथील रहिवासी असून त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) ब, व कलम ४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टाइम्स स्पेशल

महाड तालुक्यातील जंगलांमधून मोठ्या प्रमाणावर खैराची अनधिकृतपणे जंगलतोड होत असताना व त्यावर नियंत्रण ठेवणे वनाखात्याचे काम असताना पोलिसांनी खैराची अनधिकृत वाहतूक करणारी जीप पकडली याबाबत वनखाते किती जागृत आहे हे यावरून सिद्ध होत असून वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना खैरवृक्षाची अनधिकृत पणे वृक्षतोड चालू असल्याची सुतराम कल्पना नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg