loader
Breaking News
Breaking News
Foto

मालोंड मुस्लिमवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

पोईप (वार्ताहर) - मालवण तालुक्यातील मालोंड मुस्लिम वाडी येथील ग्रामस्थांनी नुकताच जिल्हा प्रमुख दता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मालोंड मुस्लिम वाडी येथील जनतेच्या विकास समस्या गेली अनेक वर्षे पाठपुरावा करुनही पूर्ण न झाल्याने अखेर आम.निलेश राणे व जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी मुस्लिम ग्रामस्थांचा वतीने जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्यामध्ये दफन भुमीला कंपाऊंड वॉल व सोलार पॅनल लाईट, तसेच तीन हाउस पावलं सोलार पंप मोटर येथील विहिरींवर बसवून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात यावी अशा प्रमुख समस्या व मागण्या केल्या असून सदर सर्व मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील आपण सर्वांनी शिवसेना पक्षाच्या व आम.निलेश राणे यांच्या पाठीशी ठाम राहून आगामी निवडणुकीत आपले सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी कराल असे आवाहन जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या सोबत तालुका संपर्क प्रमुख राजेंद्र गावकर, छोटू ठाकुर, पंकज वर्दम, जितेंद्र परब, संतोष पालव, सरपंच पुर्वा फणसगावकर, बाळा पारकर, शाखाप्रमुख सागर राऊळ, उपशाखा प्रमुख शुभम घाडीगांवकर, चंद्रशेखर परब, वेरली सरपंच धनंजय परब, बाळा परब, यांनी मार्गदर्शन केले. पक्षप्रवेशकर्ते मुस्लिम ग्रामस्थ दीलशादबी अ.मुनाफ मीर, मिरअल्ली अ.मुनाफ मिर, तबस्सुम मि. मिर, महेरुसान्निका इ. मिर, आरीफ इ. मिर, रीज्वाना आ. मिर, दाऊद मिर, हानिकाबी दा. मिर, दाऊद महंमद मिर, शादाब दा. मिर, यास्मिन दाऊद मिर, साहिल दा. मिर, मुश्ताक ह. मिर, नसिम मु.मिर, सनिया मु.मिर, नासीर हा. मिर, रीयाना मिर, नज्माबी म. मीर, मामुद शेख, रज्जाक म. मिर, फैसल र. मिर, आकिदा र. मिर, इस्माईल म.शेख, सुलतान ल.शेख, शैनाज सु. शेख व इतर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg