loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणी भाषेला जागतीक दर्जा मिळवून देणारे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

रत्नागिरी- कोकणातील सुप्रसिद्ध वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन झाले आहे. मालवणी भाषेला त्यांनी जागतिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मालवणी भाषेतील नाटक वस्त्रहरण त्यांनी जगात अनेक ठिकाणी प्रसिद्ध विनोदी कलाकर मच्छिंद्र कांबळी आणि सहकार्‍यांमार्फत पोहचविले. मालवणी बोलीभाषेला मुख्य प्रवाहात आणणारे तसेच जागतिक दर्जा मिळवून देणारे ’वस्त्रहरण’ चे लेखक गंगाराम गवाणकर यांचं निधन झालं आहे. ८६ वर्षांच्या गंगाराम गवाणकरांचे सोमवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वयोनुसार आजाराशी झुंजणार्‍या गवाणकर यांच्यावर दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. गंगाराम गवाणकर यांनी मालवणी भाषेत लिखाण केले. पण ’वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने गंगाराम गवाणकर यांना मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर केले. मालवणी भाषेतील हे पहिले नाटक मुख्य प्रवाहात आले आणि या नाटकाने इतिहास रचला. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता बोरिवली येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दहीसर येथील अंबावाडी दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg