loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर तालुका तेली समाज सेवा संघ यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - राजापूर तालुका तेली समाज सेवा संघ यांच्यावतीने वार्षिक सर्वसाधारण सभा व शैक्षणिक,सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणवंतांचा गुणगौरव समारंभ मातोश्री सभागृह जवाहर चौक राजापूर येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला सुरवात करताना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व संताजी जगनाडे महारांजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विद्याधर राणे यांनी प्रास्ताविक करताना आजची सर्वसाधारण सभा, गुणगौरव समारंभ,सध्याची राजापूर तालुक्याची वाटचाल याचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी विद्यार्थी आणि समाज बांधव यांना नजरेसमोर ठेवून प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी,चिकाटी,श्रद्धा आणि सबुरी,उद्दीष्ट या सर्व बाबी उदाहरणासहीत पटवून देत विद्यार्थी काय आणि समाज काय पुढं गेल्याशिवाय रहाणार नाही हा संदेश पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला रत्नागिरीतून जेष्ठ समाज कार्यकर्ते नारायण झगडे,लांजा येथून जिल्हा युवक सचिव रोहन पावसकर, तालुका युवा सचिव वैभव राजापकर आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन संजय बाकाळकर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका खजिनदार अर्जुन (भाऊ)लांजेकर, प्रशांत कुवेसकर, अरविंद लांजेकर,नरेश शेलार,रविंद्र सकपाळ,वसंत सकपाळ, सुभाष रहाटे,बंड्या बाकाळकर, राजाभाऊ रसाळ,जितेंद्र तुळसवडेकर,संतोष बाकाळकर,विजय खानविलकर, वैभव कुवेसकर, विजय आंब्रे, गणेश खानविलकर,विठ्ठल शेलार संतोष तेली,सुहास मणचेकर,अनंत खानविलकर,नाना कुवेसकर स्नेहा रहाटे,कल्याणी रहाटे, सुप्रिया रहाटे,सौ.नलिनी शेलार मँडम, सुप्रिया कुर्ले,स्वराली धालवलकर,श्रीमती माधवी मणचेकर व सर्व समाज बांधवांनी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg