loader
Breaking News
Breaking News
Foto

पाली बस स्थानकावर प्रवाशाचा मोबाईल चोरीला

देवळे (प्रकाश चाळके) - पाली येथील बसस्थानकावर चाफवली, (ता. संगमेश्वर,) राजेंद्र रामचंद्र जांगळी यांचा मोबाईल चोरीला गेला आहे. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजताच्या दरम्यान ते रत्नागिरीकडे येत होते. त्यावेळी ते पाली बस स्थानकावर थांबले होते. त्यानंतर राजापूर–रत्नागिरी एस.टी. बसमध्ये चढत असताना निळ्या रंगाचा आयफोन-१३ मोबाईल चोरीला गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेनंतर त्यांनी पाली बस स्थानकावरील कंट्रोल रूममध्ये चौकशी केली असता त्यांनी तेथे सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याचे सांगितले. पाली सारख्या अति महत्त्वाच्या बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे असणे फार गरजेचे असताना सी.सी.टी.व्ही. त्वरित बसवावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे . पाली बसताना पुणे कोल्हापूर व राजापूर सिंधुदुर्ग तसेच गोव्याकडे जाणाऱ्या सर्व बससाठी महत्वाचे बसस्थानक आहे. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अजूनही गरजेचे आहे.

टाइम्स स्पेशल

कंट्रोल केबिन मध्ये सदरची माहिती घेतल्यानंतर जांगळी यानी पाली पोलीस स्टेशन येथे आपली तक्रार दाखल केली आहे. चोरी गेलेल्या मोबाईलमध्ये महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे, फोटो व वैयक्तिक माहिती असल्याने मोबाईल शोधण्यात मदत व्हावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg