loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत सूर्यदेवतेच्या उपासनेचा छटपूजा महापर्व सोहळा उत्साहात साजरा

रत्नागिरी (रत्नागिरी टाइम्स डेस्क) - रत्नागिरी येथे यंदा देखील सूर्यउपासकांच्यावतीने उत्तर भारतीयद्वारा महापर्व छठपूजा महापर्व सोहळा मोठया भक्तीपूर्ण वातावरणात व आनंदात साजरा करण्यात आला. सदर छठपूजा सोमवार सायंकाळी सूर्यास्तावेळी ठीक ५.३० वाजता सुरु झाली आणि सूर्यदेवाला अर्ध्य देण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आज सकाळी सूर्यादयाच्यावेळी ६.२५ वाजता सूर्यदेवाला अर्ध्य देऊन पूजाविधी पार पडल्या. तसेच प्रसाद वितरणही झाले. या पूजेचे वैशिष्टय म्हणजे ज्या महिला व्रतधारी असतात त्यांचा सलग ३६ तास निर्जला उपवास असतो. सदरचे छठपूजेचे दोन्ही कार्यक्रम रत्नागिरी येथील भाट्ये श्री झरीविनायक मंदिराजवळ समुद्रकिनारी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी व्रतधारी भगिनी व भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा छठपूजेचा महापर्व सोहळा मुकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रत्येक वर्षी उत्तर भारतीय नागरिकांतर्फे सूर्य उपासकांना छठपूजेसाठी निमंत्रित केले जाते. या सोहळ्यात स्थानिक नागरिक देखील सहभागी होतात. रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक सुधाकर सावंत, दिपक राऊत आणि इतर मान्यवर यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. उत्तर भारतीय नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी स्थानिकांचा सहभाग मोलाचा ठरला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg