loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणदे ग्रामपंचायत कार्यालय सभागृहाचे आ. भास्कर शेठ जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

गुणदे (वार्ताहर) - खेड तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायत इमारतीच्या वरच्या मजल्या करीता आमदार भास्करशेठ जाधव यांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्याचे काम पूर्ण होऊन सुसज्ज असे ग्रामपंचायत सभागृह तयार झाले. या सभागृहाचे उद्घाटन नुकतेच आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकामध्ये राजेंद्र आंब्रे यांनी आमदार भास्करशेठ जाधव यांच्या माध्यमातून गुणदे गावामध्ये पूर्ण करण्यात आलेली विकास कामे यांची यादी वाचून दाखवली तसेच प्रस्तावित नवीन कामे मंजूर करावी अशी आमदार भास्करशेठ जाधव यांना विनंती केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार भास्करशेठ जाधव म्हणाले की, गुणदे गावामध्ये यापूर्वीही विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणात माझ्याकडून करण्यात आलेली आहेत आणि यापुढे देखील विकासात्मक कामे ही माझ्याकडून पूर्ण होतील परंतु केवळ निवडणुकीपुरते येणारे उमेदवार यांनी किती विकास केला आणि त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी किती विकास केला हे पहा. केवळ निवडणुकीला पैशाचा बाजार मांडून लोकांना आपलेसे करायचे अशा भुलाथापांना बळी पडू नका. विकासासाठी कधीही मी कमी पडणार नाही. माझ्याकडून पाहिजे तेवढा विकास करून घ्या, असे आवाहनही केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी आमदार भास्कर शेठ जाधव यांचा गुणदे ग्रामपंचायतवतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रांत शेठ जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा, सचिन शेठ(पप्पू) आंब्रे उपजिल्हा प्रमुख, सौ.अरुणाताई आंब्रे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख, विष्णुपंत आंब्रे उप तालुकाप्रमुख, अंकुश काते तालुकाप्रमुख, बावा शेठ कदम, जयेश पालांडे, रवींद्र आंब्रे सरपंच गुणदे, सौ.रुणाली आंब्रे उपसरपंच, सौ. आरती मोरे /शेलार ग्रामविकास अधिकारी, आशिष कांबळे ग्राम महसूल अधिकारी गुणदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या महिला इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटोळे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg