loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रसाद विचारे यांना पहिला राज्यस्तरीय "सह्याद्री रत्न निलेश बापट आदर्श वन्यजीव रक्षक पुरस्कार-२०२५ " जाहीर

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते,सर्पमित्र प्रसाद अर्चना अरविंद विचारे यांना वर्ल्ड फॉर नेचर इंडिया, शाखा -रत्नागिरी यांचे वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सह्याद्री रत्न निलेश बापट आदर्श वन्यजीव रक्षक पुरस्कार-२०२५ जाहीर झाला आहे.हा पुरस्कार सामाजिक कार्य तसेच निसर्ग, प्राणी,पक्षी, सर्प,सरीसृप, वन्यजीव यांचे बचावासाठी व संकटात असणाऱ्या प्राण्याला जीवदान देण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाला हा विशेष पुरस्कार दिला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मागील काही वर्षांपासून शेकडो विषारी, निमविषारी, बिनविषारी सर्प पकडण्याचा, वन्यजीव वाचविण्याचा अनुभव प्रसाद विचारे यांचे पाठीशी आहे. वन्यजीव, प्राणी, पक्षी, व सामाजिक कार्य नेहमीच करत असतात. हें कार्य करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या आईपासून मिळाली, असे ते म्हणतात.नेहमीच त्यांच्या सोबत सिद्धिविनायक मंडळ, मराठवाडीतील सर्व सदस्य तसेच विशेष करून वरवेली गावं व मुंबई मधून सगळ्यांकडूनच पाठिंबा तसेच स्वतः ची काळजी घेऊन हें कार्य करत जा, असे हीं बोलून नेहमीच सहकार्य असते तसे आवर्जून सांगतात. साप, पक्षी, वन्यजीव यांना वाचविले पाहिजे कारण गावागावात होणारी बेसुमार जंगलतोड थांबविली तर असे वन्यजीव आपल्याजवळ फार कमी प्रमाणात येतील आणि आलेच तर त्यांना न मारता वन अधिकारी यांना कळवावे तसेच साप हीं शेती साठी उपयुक्त आहेत. त्यांना मारू नये.साप चावला तर भोंदू बाबा कडे न जाता, अंधश्रद्धेला बळी न पडता जवळच्या शासकीय दवाखान्यात तात्काळ जाऊन उपचार घेणे महत्वाचे आहे. तसेच यापुढेही निःस्वार्थपणे या क्षेत्रात सर्वांच्या साथीने काम करत राहणार, असेही प्रसाद विचारे म्हणाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg