loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वसामान्यांचे फॅमिली डॉ. मधुकर लुकतुके यांचे निधन, दाभोळ पंचक्रोशी शोकमग्न

दाभोळ (स्वप्नील घटे) :- सर्व सामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके यांचे पुणे येथे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने अनेकांना दुःख आहे. डॉ. मधुकर लुकतुके सन १९६१ मध्ये दाभोळला आले सन १९५९ मध्ये ते MBBS झाले. त्यांनी आरोग्य खात्याकडे अर्ज केला आणि लगेचच त्यांना कोकणात दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे M.O म्हणून नेमणूकीची ऑर्डर मिळाली. कोल्हापुर जिल्हयातील आजरा हे त्यांचे गाव सन १९३५ मध्ये त्याचा जन्म झाला. सन १९७१/७२ मध्ये वरीष्ठ डॉक्टर म्हणून त्यांना काही काळ रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. १३/१४ वर्षाच्या शासकीय सेवेनंतर त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टीसला सुरुवात केली. त्यांचा दाभोळ गावात छोटासा दवाखाना होता. दाभोळ पंचक्रोशीतील रुग्णासाठी ते अव्याहत धावुन गेलेले आहेत. सुरुवातीच्या काळात वाहने नव्हती, रस्ते नव्हते, त्यावेळी ते चालत सायकल ने दाभोळ पंचक्रोशीतील गावात जाऊन रुग्णांना रुग्णसेवा देत असत. अत्यंत चांगले नाडी परिश्रण होते. याच बरोबर रुग्णावर केल्या जाणाऱ्या उपचारांनी रुग्ण हा बरा होत असत. यामुळे डॉ. लुकतुके हे अल्पावधीतच रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून सुपरिचित झाले. त्यांचा वैद्यकीय सराव चांगला होता. आता प्रकृती साथ देत नसल्यामुळे ते काही महिन्यापासून दाभोळ येथील दवाखान्यात येत नव्हते. त्यांचे रोगनिदान अचूक असे. एखादा रुग्ण गंभीर असेल तरच ते पुढील उपचारार्थ पाठवित असत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांना संगीताची आवड होती, पुस्तक वाचनाचे त्यांना भयंकर वेड होते. वणौशी मध्ये त्यांनी जागा घेवून बंगला बांधला. काही महिन्यापूर्वीच त्यांचा ९० वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने पण उत्साहात वणौशी येथे साजरा करण्यात आला होता. त्यांच्या वैदयकीय सेवेची दखल येथील एन.डी.एस ग्रुप ने घेऊन त्यांचा असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत डॉ.व्ही.एन. श्रीखंडे यांच्या हस्ते भव्य दिव्य असा सत्कार घडवून आणला तो सत्कार आज ही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. त्यांना ' मुंबईतील युआरएल फाऊंडेशनचा सन २०१४ चा सामाजिक गौरव पुरस्कार प्राप्त झाला. अतिशय प्रेमळ अजातशत्रू सालस असे ते व्यक्तीमत्व होते. एक कर्तव्यतत्पर पंचक्रोशीचा आधार असलेल्या डॉक्टरांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी पुणे येथे धाव घेतली आणि त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दाभोळ बाजारपेठ पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यांच्या मागे मुलगा सून, मुलगी,जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. त्यांच्यावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंकार करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg