loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी परिसरात वाघाचा धुमाकूळ; पाळये येथे दोन दिवसांत दुसरी शिकार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

तिलारी-दोडामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी खोऱ्यातील पाळये परिसरात वाघाने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली असून, काल गुरुवारी संध्याकाळी चिमणो वरक यांच्या शेळीवर झडप घालून तिला ठार केले. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांतील पाळये गावातील ही दुसरी घटना असल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पाळये गावात वाघाचा वावर वाढला असून दोन दिवसांपूर्वीच वाघाने एका बैलाची शिकार केली होती. ही घटना ताजी असतानाच आता चिमणो वरक यांच्या शेळीचा बळी घेतल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केवळ पाळयेच नव्हे, तर गेल्या काही दिवसांपासून तिलारी पट्ट्यातील सोनावल, मेढे, मुळस आणि हेवाळे या गावांमध्येही वाघाने पाळीव जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाघाच्या या वाढत्या सक्रियतेमुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणे आणि पशुपालकांनी जनावरे चरायला नेणे कठीण झाले आहे. सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडणेही आता जोखमीचे ठरत आहे. या भागात वाघाने अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वनविभागाने तात्काळ या घटनांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg