loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेबांबर-उसप रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून लेखी आश्वासन; उद्यापासून कामाला सुरुवात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर ते उसप या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सौ. विनीती विष्णू घाडी यांनी पुकारलेल्या आंदोलनाची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे होणारे हाल आणि अपघाताची भीती लक्षात घेऊन सौ. घाडी यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज दोडामार्ग पंचायत समितीच्या वतीने त्यांना अधिकृत पत्र देण्यात आले असून, उद्यापासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

झरेबांबर-उसप हा रस्ता तीन वेगवेगळ्या विभागात विभागलेला असून, त्यातील झरे शेळपी ते बाबरवाडी हा भाग जिल्हा परिषद अंतर्गत येतो. या भागावर पूर्वी खड्डे भरले गेले होते, मात्र सततच्या वाहतुकीमुळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले होते. या मार्गाच्या संपूर्ण नूतनीकरणासाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सावंतवाडी यांच्यामार्फत प्राधान्याने आराखडा मंजूर करण्यासाठी सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळताच या भागाचे डांबरीकरण हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच पिकुळे तिठा ते उसप हा रस्ता 'इतर जिल्हा मार्ग' संवर्गात येत असून, त्यावर सध्या 'ग्रामसडक योजने' अंतर्गत कामाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या असलेल्या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करून मार्ग सुलभ करण्यासाठी उद्यापासूनच रस्त्यावर आवश्यक खडी व साहित्य टाकण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि सौ. विनीती घाडी यांच्यासह ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकहिताच्या या कामासाठी प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याने तूर्त आंदोलनाचा पवित्रा मागे घेण्यात आला असला, तरी कामाच्या गुणवत्तेवर आणि गतीवर आमचे बारीक लक्ष राहील, असे सौ. घाडी यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

विनीती घाडी यांच्या पाठपुराव्याला यश

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg