loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप आणि शिवसेनेचे प्रभाग २११ आणि २१२ मध्ये उमेदवारांचे अर्ज बाद, मात्र राज्यात भाजपचे ३ उमेदवार निवडणुकीपूर्वी जिंकतील

मुंबई - यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर 24 तास उलटत नाही तोच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील दोन वॉर्डमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाद झाले आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच या दोन्ही प्रभागांमधून महायुती रिंगणाबाहेर पडली आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 आणि वॉर्ड क्रमांक 212 मध्ये महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नसेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज हा कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे फेटाळण्यात आला आहे. तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्जही बाद ठरवण्यात आला आहे. मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात 15 मिनिटं उशीरा पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपच्या मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आहे. त्यांच्या या वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना रिंगणात उतरवले आहे. या वॉर्डात अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, काँग्रेससह अन्य पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी ठाकरे बंधूंच्या एकत्रित ताकदीमुळे श्रावणी हळदणकर यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे यानिमित्ताने मुंबईत मनसेला पहिल्या विजयाची चाहूल लागल्याचे बोलले जात आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, मुंबईतील या एका प्रभागात भाजपचा भ्रमनिरास झाला असला तरी राज्यातील अन्य महानगरपालिकांमध्ये मतदानापूर्वीच भाजपचे चार नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रेखा चौधरी आणि आसावरी नवरे या दोन नगरसेविकांचा समावेश आहे. प्रभाग 18 अ'मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांनीही विजय मिळवला आहे. आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेत नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक- 18 ( ब) मधून हि निवड झाली आहे. तर धुळे महानगरपालिकेत भाजपच्या उज्ज्वला भोसले या प्रभाग क्रमांक 1 मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg