loader
Breaking News
Breaking News
Foto

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने पूजनीय भिक्षू संघाची गुहागर तालुक्यात चारिका उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - बौद्ध भिक्षू संघाची गुहागर तालुक्यात पाच दिवस धम्मचारीका बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्षु संघाची बुद्धाच्या धम्म मार्गाने वाटचाल, या चारिका समारंभाचा प्रारंभ दापोली येथून फेरी बोटीने धोपावे येथे धोपावे येथून चालत रानवी येथे रानवी येथून चालत पवार साखरी येथे पवार साखरी येथून चालत पेवे येथे पेवे येथून चालत कारूळ येथे कारूळ येथून चालत तळवली येथे तळवली येथून चालत निगुंडळ येथे निगुंडळ येथून चालत पालपेणे येथे आणि पालपेणे येथून जानवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे येथे पूजनीय बौद्ध भिक्षु संघाची पायी चालत चारिका अतिशय मिरवणुकीने स्मारक सभागृहात आली. यावेळी बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर धम्म संघटनेच्या व संस्कार कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी बौद्ध भिक्षु संघाचे उत्फुर्तपणे स्वागत केले. यावेळी बौद्धजन सहकारी संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश (दादा) सावंत यांनी आसाम येथून आलेले बौद्ध भिक्षू खेमपाला यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले त्यानंतर कार्याध्यक्ष मारुती मोहिते यांनी गुहागर तालुक्यातील स्थानिक बौद्ध भिक्षू विमलबोधी यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले तर उपकार्याध्यक्ष अनिल सुर्वे यांनी कर्नाटक येथील बौद्ध भिक्षू धम्मतिस्स यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले. तसेच सरचिटणीस सुनील गमरे यांनी बौद्ध भिक्षूंचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर आसाम येथील बौद्ध भिक्षू खेमपाला त्यांचे शुभ हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर स्थानिक बौद्ध भिक्षू विमलबोधी यांनी भिक्षु संघाची पाच दिवसाची चारिका आणि आलेले अनुभव आणि धम्माचा प्रचार, प्रसार कसा करायचा याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. यानंतर बुद्ध पूजा पाठाचा, बुद्ध वंदनेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या बुद्ध पूजा पाठानंतर आसामचे बौद्ध भिक्षू खेमपाला यांनी आपल्या गोड वणीने धम्मदेसना दिली. या धम्मदेसने मध्ये बौद्ध भिक्षू खेमपाल यांनी बुध्द धम्माचे आचरण कसे करावे? धम्माच्या मार्गाने गेल्यावरच मानवाचे कल्याण होते. बुद्ध धम्म मानवाच्या कल्याणाचा मार्ग असून या मार्गाने जाण्यात मानवाचे हित आहे. सर्वांनी त्रिसरण पंचशील याचे पालन करावे. सद धम्माचे पालन करावे. रागाचा, द्वेषाचा त्याग करावा. प्रेम अंगिकारावे. प्रेमाने सर्वांची मने जिंकावी. आई-वडिलांचा आदर करावा. प्रत्येकाशी सौजन्याने आणि प्रेमाने वागावे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला धम्ममार्ग आणि शिक्षणाचा मार्ग अंगीकारल्यास जीवन यशस्वी होईल, असा संदेशही आसामचे बौद्ध भिक्षू खेमपाला यांनी दिला.

टाइम्स स्पेशल

या संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, संस्कार कमिटी यांनी केले होते. यावेळी बौद्धजन सहकारी संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनील गमरे, विश्वस्त शंकर मोहिते,पराग सावंत, मनीष गमरे, संस्कार कमिटी अध्यक्ष शशिकांत जाधव, चिटणीस सुभाष जाधव, सदस्य उमेश कदम, चंद्रकांत गमरे, संदीप गमरे, अनामिका कदम, विभाग अधिकारी मनोज गमरे,भिकाजी मोहिते, दशरथ पवार, राजेश मोहिते, प्रवीण जाधव, सुरेश जाधव,चंद्रकांत मोहिते, नरेंद्र मोहिते, प्रवीण कदम, मंगेश कदम, सचिन कदम, संतोष पवार,सिद्धार्थ गमरे, विनोद यादव यांचे सह बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या विभाग नं. 1 ते विभाग नं. 7 मधील सर्व सभासद बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार कमिटीचे अध्यक्ष शशिकांत जाधव, चिटणीस सुभाष जाधव यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg