loader
Breaking News
Breaking News
Foto

शनिवारच्या आठवडा बाजार परिसराचा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी घेतला आढावा, बेशिस्त वागणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणार

रत्नागिरी : नुतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्व यांनी शहरातील नागरिकांच्या मूलभूत गोष्टींवर अधिक भर दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारचा बाजार आणि शनिवारचा आठवडा बाजारातील व्यवसायिकांना आणि वाहन धारकांना शिस्त लावण्याचा चंग बांधला आहे. शहरातील ग्राहकांना सहज खरेदी करता यावी यासाठी बाजारात चुकीच्या पद्धतीने बसणारे व्यापारी, कचरा तिथेच टाकूण देणारे, वाहन पार्किंग कुठेही करणे, अशा गोष्टींना शिस्त लावण्यासाठी त्यांनी स्थानिक नगरसेवकांना घेऊन पाहणी केली. त्यानंतर त्याचा आढावा देखील घेतला. आणखी एकवेळा समजावून सांगणार. त्यानंतर बेशिस्त वागणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणार, असा इशारा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी शहरामध्ये शनिवारी आठवडा बाजार भरतो तर नाचणे येथे मंगळवारी बाजार भरतो. नाचणे हे मध्यवर्ती ठिकाणी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात तिथे खरेदीसाठी गर्दी होते. तिथे जागा देखील प्रशस्त आहे. परंतु व्यापार्‍यांना आणि वाहनधारकांना शिस्त नसल्याने खरेदी करणार्‍या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रार आल्या होत्या. त्या उषंगाने नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि स्थानिक नगरसेवक मेधा कुळकर्णी, राजू कीर आणि पालिकेच्या अधिकार्‍यांना घेऊन मंगळवारी प्रत्यक्ष आठवडा बाजारात पाहणी केली. तिथे त्यांना चुकीच्या पद्धतीने कुठेही आपला व्यवसाय मांडलेले व्यापारी, छोटे, मोठे विक्रेते आणि बेशिस्त वाहन पार्किग दिसून आले. याबाबत नगराध्यक्षांनी व्यापार्‍यांना सूचना देऊन काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्याचे पालन झाले की नाही, हे देखील त्यांनी पुन्हा जाऊन पाहिले. तर २५ टक्के सुधारणा झाली होती. आणखी एकदा व्यापार्‍यांना आणि वाहनधाऱकांना याबाबत सूचना केली जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

त्यानंतर मात्र कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शहरात भरणार्‍या आठवडा बाजाराबाबत देखील त्यांनी तिच भूमिका घेतली आहे. येत्या आठवडा बाजारात त्या पाहणी करून तिथेही बेशिस्त बसणार्‍या व्यावसायिक आणि वाहन धारकांना समज दिली जाणार आहे. कारण आठवडा बाजारात मुख्य रस्त्यावर वाहने पार्किंग करून ठेवली जातात. काही व्यावसायिक रस्त्याला लागून बसतात. त्यामुळे मोठी वाहने आली की वाहतूक कोंडी होते. हा प्रश्न देखील सोडविला जाणार आहे. एकदा किंवा दोन वेळा समज दिली जाणार नाही. त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg