loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवलीनजीक दुचाकी व ट्रक भीषण अपघातात राजापूर येथील २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

कणकवली ३१ डिसेंबर (प्रतिनिधी)- मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक हुंबरठ येथे दुचाकी व ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अमान अब्दुल गनी खतीब ( वय २१, रा. राजापूर) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी १०:३० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अमान अब्दुल गनी खतीब हा सावंतवाडी येथून राजापूरच्या दिशेने जात होता. यावेळी हुंबरठ येथे यु टर्न घेत असताना दुचाकीने मागून ट्रकला धडक दिली, असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. अमान खतीब हा राजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचा सुपुत्र आहे. अपघातात अमान खतीब याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर काही प्रमाणात रक्तस्त्राव देखील झाला होता. तातडीने अमान याला १०८ नंबर च्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत अमान कडून उपचारांना कोणत्याही प्रकारची साथ मिळत नव्हती. अखेर त्याचा मृत्यू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अधिक माहिती अशी की, अमान खतीब हा बुधवारी सकाळी कामानिमित्त आपली दुचाकी घेवून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडी येथून राजापूरकडे परतत असताना त्याची कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी बाबू गोविंद गुरव (रा. हुंबरठ वरची गुरववाडी) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक हरीश सर्जेराव पाटील (52 रा. राधानगरी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमान याच्या अपघाती मृत्युमुळे खतीब कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमान हा पुतण्या होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg