loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. व पं.स. निवडणूक घ्यायच्या अगोदर गावपातळीवरील निवडणुका घ्या : गुरुदास गवंडे

बांदा (प्रतिनिधी) - जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५ ग्रामपंचायत मधील १२५ ग्रामपंचायत सदस्य पद रिक्त आहेत आणि थेट ०५ सरपंच पद रिक्त आहेत. ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे देऊन दोन वर्ष झाली तरी अजून निवडणुका का होत नाही जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीतून दोन वेळा निवडणूक व्हावी यासाठी अहवाल पाठवण्यात आला. उदाहरण निगुडे ग्रामपंचायत एका सदस्याने जून २०२३ रोजी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला परंतु अजून ते पद रिक्तच आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हे काय निवडणूक आयुक्त कार्यक्रम जाहीर करणार आणि नंतर घेणार काय आता ग्रामपंचायतच्या २९ डिसेंबर २०२७ ला मुदती संपत आल्यात काही फेब्रुवारी मध्ये संपणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कितीतरी जणांनी ग्रामपंचायत सदस्याचे राजीनामे दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परंतु कुठच्याही आरक्षण किंवा अन्य पासून काही नसताना निवडणुका का घेतल्या जात नाही? सर्व सामान्य मतदार प्रभागात आपल्या समस्या घेऊन कुठे जाणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यापेक्षा आधी या गावपातळीवरील निवडणुका घ्या. लोकशाही संपुष्टात आली की काय असं प्रत्येक गावात. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक घ्यायच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.

टाईम्स स्पेशल

नियमाने सहा महिने झाले की निवडणूक घ्यायची असते. परंतु दोन दोन वर्ष जर निवडणुका होत नसतील तर काय म्हणून या ठिकाणी जनतेने पाहायचं जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर या निवडणुका जाहीर कराव्यात. त्या ठिकाणी काय मोठे यंत्रणा लागत नाही एकच सक्षम निवडणूक अधिकारी लागू शकतो. जिल्ह्यात १२५ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिलेत. त्यामुळे आज लोकशाही धोक्यात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी टीका गवंडे यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg