loader
Breaking News
Breaking News
Foto

खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा

खेड (दिलीप देवळेकर) — खेडमधील द. ग. तटकरे सभागृह येथे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक या मेळाव्यास उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी श्रीमती सानिका आंब्रे, सचिन आंब्रे, संजय मोरे, गणेश मोरे, कृष्णा मांडवकर, बाळाराम साळवी आणि रमाकांत पिंपळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जाहीरपणे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खा. सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने स्वागत करून त्यांना राष्ट्रवादी परिवारात सामावून घेतले. यावेळी मार्गदर्शन करताना खा. तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाभिमुख भूमिका, सामाजिक न्यायाची बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेला संघर्ष याबाबत सविस्तर भूमिका मांडली. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील जनतेशी संपर्क वाढवण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

टाइम्स स्पेशल

या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल, तसेच आगामी काळात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि घोषणांच्या गजरात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg