loader
Breaking News
Breaking News
Foto

घरडा कंपनी लोटेकडून जि.प.वरवली नं.१ शाळेला स्वच्छतागृह

खेड - घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे यांच्याकडून जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वरवली नं.१ शाळेला देण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे येथील बापूराव पवार सिव्हिल इंजिनियर सनगरे, वरवली गावच्या सरपंच सौ. प्राजक्ता दीपक यादव, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित सावंत व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते गणपत झोरे व आंबवली गावचे सामाजिक कार्यकर्ते शेखर यादव, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल यादव, बचत गटाच्या अध्यक्षा व सर्व सदस्य, वरवली गावचे पोलीस पाटील गणेश आखाडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी विजय आत्माराम निकम, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री. कडव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर स्वच्छतागृहाचे उद्घाटन बापूराव पवार व सिव्हिल इंजिनियर सनगरे तसेच वरवली ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक कडव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg