loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पोलीस ठाण्यातर्फे २ ते ८ जानेवारी दरम्यान 'पोलीस स्थापना दिन सप्ताह'

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २ ते ८ जानेवारी या कालावधीत 'पोलीस स्थापना दिन सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्यातर्फे या सप्ताहात नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सप्ताहातील मुख्य कार्यक्रमांची रुपरेषा: ​२ जानेवारी: सकाळी १० ते १२ या वेळेत आर.पी.डी. हायस्कूल येथे निमंत्रित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा पार पडेल. तसेच मळगाव हायस्कूल येथे पोलीस कामकाज, सायबर क्राईम आणि शस्त्रास्त्रांबाबत माहितीपर प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ​३ जानेवारी: सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत तीन मुशी नाका येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात भव्य माहिती स्टॉल्स उभारले जातील. यामध्ये सायबर सेल, बॉम्ब शोध व नाशक पथक , भरोसा सेल, वाहतूक विभाग आणि पोलीस वाद्यवृंद पथकामार्फत नागरिकांना माहिती दिली जाईल. ​४ जानेवारी: पोलीस स्टेशनसमोरील मैदानावर सायंकाळी ४ वाजल्यापासून पोलीस, पत्रकार, पोलीस पाटील आणि शासकीय विभाग यांच्यात व्हॉलीबॉल स्पर्धा रंगणार आहेत. ​५ जानेवारी: सकाळी ६:३० वाजता मोती तलाव परिसरात आरोग्य जागृतीसाठी 'मॉर्निंग वॉक' चे आयोजन करण्यात आले आहे. ​६ जानेवारी: सायंकाळी ५ ते १० या वेळेत पोलीस ठाण्याच्या आवारात ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि महिलांसाठी विविध खेळ व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ​७ जानेवारी: रोटरी क्लब आणि अन्य संघटनांच्या सहकार्याने पोलीस ठाण्याच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

या सप्ताहादरम्यान विविध शाळांना पोलीस ठाण्याला भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेता येईल. या सर्व उपक्रमांमध्ये सावंतवाडीतील नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg