loader
Breaking News
Breaking News
Foto

निवृत्त कर्मचारी संघटनेकडून नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचा सत्कार; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

सावंतवाडी - सावंतवाडी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचा 'महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर व अधिकारी कर्मचारी संघटना' (तालुका शाखा सावंतवाडी) यांच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कार समारंभादरम्यान संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी. बी. चव्हाण आणि तालुकाध्यक्ष लवू चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सावंतवाडी नगर परिषदेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधले. "निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते तातडीने सोडविण्यात यावेत," अशी आग्रही विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संघाटनेची मागणी लक्षात घेता नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. "सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संघटनेने सविस्तर लेखी पत्र सादर करावे. त्यानंतर रीतसर चर्चेसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येईल आणि समस्या सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नगराध्यक्षांच्या या भूमिकेचे संघटनेने स्वागत केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी लखमराजे भोसले यांची विशेष उपस्थिती होती. तसेच संघटनेचे संभाजी कांबळे (उपाध्यक्ष), वसुंधरा चव्हाण (कार्याध्यक्ष), चंद्रकांत आकेरकर (सल्लागार), दत्ताराम म्हापणकर, विजय ओटवणेकर, सदानंद सांगेलकर (सदस्य) कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी कार्याध्यक्ष वसुंधरा चव्हाण यांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg