दापोली ( प्रतिनिधी) - स्वच्छ, स्वस्त आणि ताज्या मासळीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या बुरोंडी बंदरावर होड्या लावण्यासाठी जेटीचे बांधकाम करण्यात आले नसल्याकारणाने मासेमारी करणाऱ्या मासेमार बांधवांचे हालच हाल होत आहेत. दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदर हे स्वच्छ, स्वस्त आणि ताज्या मासळीसाठी दापोलीत सर्वदूर ख्याती आहे. एक ऐतिहासिक बंदर म्हणून ओळख असलेल्या या बुरोंडी बंदराचा विकास आजही खितपत पडला असून त्याची झळ येथील स्थानिक मच्छीमार बांधवाना बसत आहे. मलपी परप्रांतीय फास्टर बोटींनी हैदोस घातल्याने तसेच एलईडी लाईटव्दारे केल्या जाणाऱ्या मासेमारींने येथील स्थानिक मासेमारांना एकतर मासळी मिळेनाशी झाली आहे त्यामुळे ते आधीच संकटात सापडले आहेत. त्यातच समुद्रातून पागून आणलेली मासळी किनाऱ्यावर उतरताना होडया लावण्यासाठी जेटी नसल्याने आणखीन एका मोठ्या संकटाची त्यात भर पडली आहे. बुरोंडी बंदराचा विचार करता या बंदरात मासेमारी करणा-या साधारणपणे 135 च्या दरम्यान लहान मोठ्या होडया आहेत. या होडयांचे मालक आपल्या खलाशी नाखवांसह दररोज मध्यरात्री 2 ते पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बंदरात मासेमारी करण्यासाठी जातात आणि साधारणपणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात पागलेली मासळी किनाऱ्यावर घेऊन परत येतात. ही मासळी घेऊन येताना बंदरावर जेटी बांधलेली नसल्यामुळे त्यांना मोठाच त्रास सहन करावा लागतो आहे.
विकास विकास म्हणून मोठ मोठ्या विकासाच्या बाता मारणा-यांना म्हणावं बंदरावर मासळी उतरताना मासेमारांना कशा संकटातून किनाऱ्यावर यावं लागतं याची कधीतरी प्रत्यक्ष बंदरावर येवून पाहणी करून मासेमार बांधवांची परिस्थिती काय आहे ते एकदा जरूर अनुभवा. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटून गेली तरी बंदरावर अजूनही जेटीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. याला विकास म्हणावे का? असा कोणालाही हे दृष्य पाहिल्यावर वाटून जाईल. कारण जेटी बांधलेली नसल्यामुळे मोठ्या मरणयातना येथील प्रत्येक मासेमारांना दररोजच सहन कराव्या लागतात. त्यामुळे याचा सत्वर विचार करून बुरोंडीत जेटी बांधणे किती योग्य आहे? याचा जरूर विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.


























































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.