loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर पुण्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची युती; जागावाटप जाहीर

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv sena UBT) आणि काँग्रेस यांच्यात पुण्यात अधिकृत युती झाली असून, दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची औपचारिक घोषणा केली आहे. या युतीअंतर्गत शिवसेना ठाकरे गट 45 जागांवर, तर काँग्रेस 60 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं की, पुण्यात भाजप व महायुतीच्या धोरणांना प्रभावी पर्याय देण्यासाठी आणि शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर एकत्र लढण्यासाठी ही युती करण्यात आली आहे. महापालिकेतील सध्याची परिस्थिती, नागरिकांचे प्रश्न, वाढती महागाई, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अनियोजित विकास या मुद्द्यांवर एकत्रितपणे जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

युतीतील जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्याचं स्पष्ट करताना, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं नेत्यांनी सांगितलं. उमेदवार निवडीमध्ये स्थानिक ताकद, सामाजिक समीकरणे आणि जिंकण्याची क्षमता या निकषांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg