loader
Breaking News
Breaking News
Foto

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत तीन ठिकाणी भाजपाचे नगरसेवक बिनविरोध

ठाणे (प्रतिनिधी) - कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या तीन जागा बिनविरोध होऊन भाजपाने आपले खाते उघडले आहे. उमेदवार आसावरी नवरे, रेखा चौधरी आणि रंजना पेणकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच भाजपाच्या खात्यात तीन जागा जमा झाल्या आहेत. भाजपात बिनविरोध निवडून आलेल्या आसावरी नवरे, रेखा चौधरी यांचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद घडून आणला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलमधील दृश्यध्वनी चित्रफितीव्दारे संपर्क साधला. आणि मुख्यमंत्र्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केलेल्या प्रभागात एक नगरसेविका बिनविरोध आणण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक १८ आणि प्रभाग क्रमांक २६(क) मधून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या दोन्ही प्रभाग प्रभागामधील भाजपच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या.प्रभाग क्रमांक १८ (कचोरे विभाग) मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक २६(क) मधून आसावरी नवरे बिनविरोध विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक २६(ब) मधील भाजप उमेदवार रंजना पेणकर यांच्या विरूध्द स्पर्धक उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे भाजपने डोंबिवलीत बिनविरोधाची हॅटट्रिक केली आहे. रेखा चौधरी यांना भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. आसावरी नवरे यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील कुटुंब आहे, असे चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही महिला उमेदवारांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. आणि विजय हा विजय असतो असे सांगून नव्या दमाने कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या.

टाईम्स स्पेशल

रेखा चौधरी या प्रभाग क्रमांक १८ कचोरे, नेतिवली टेकडी, गावदेवी नेतिवली मेट्रो माॅल, शास्त्रीनगर तिसगावमधील उमेदवार आहेत. रेखा चौधरी या मागील पंधरा वर्षापासून पालिकेत नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक २६(क) मधून बिनविरोध निवडून आलेल्या आसावरी नवरे या प्रथमच कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेविका म्हणून निवडून जात आहेत. आसावरी चौधरी या पॅनल क्रमांक २६ म्हात्रेनगर, राजाजी पथ, रामनगर, शिवमार्केट, सावरकर रस्ता प्रभागातील उमेदवार आहेत. या प्रभागातून उमेदवारी मिळविण्यासाठी काही माजी नगरसेविकांनी जोरदार हालचाली केल्या होत्या. पण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रभागात नवीन चेहऱ्याला संधी दिली होती. सावरकर रोड या प्रभागापासून रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. याच प्रभागातून चव्हाण हे कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg