loader
Breaking News
Breaking News
Foto

मुर्डी येथील जेष्ठनागरिक श्रीकृष्ण पेंडसे यांचा प्रामाणिकपणा; रस्त्यावर सापडलेला मोबाईल हँडसेट परत केला

दापोली (प्रतिनिधी) : आजच्या काळातही अनेकजण आपले काम हे प्रामाणिक आणि तत्परतेने करत असतात. अशाच एका कार्यतत्पर जेष्ठ नागरिकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. एका यूवकाचा हरवलेला महागड्या किंमतीचा मोबाईल त्यांनी मुळ मालकाला परत केला. याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी ३१ डिसेंबर या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आंजर्ले येथील समुद्रावर जाण्यासाठी दापोली तालुक्यातीलच ताडील येथील तीन तरुण आंजर्ले येथे आले होते. समुद्राकडे जाताना मध्येच कोठेतरी त्यातील एकाचा महागड्या किंमतीचा मोबाईल हँडसेट खिशातून खाली पडून हरवला. दरम्यान पुढे गेल्यानंतर काही काळाने आपल्या खिशात असलेला मोबाईल हरवलेल्याचे त्याच्या लक्षात आले. आणि मग शोधाशोध सुरु झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान ते ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून आंजर्ले मुर्डी येथील श्रीकृष्ण जनार्दन पेंडसे मुर्डीहून आंजर्लेकडेच चालले होते त्यांना आंजर्ले श्रीराम मंदिरानजिक जाणा-या रस्त्यावर एक मोबाईल हँडसेट पडलेला सापडला. त्यांनी याबाबत आपल्या परिचयाची लोक तसेच आंजर्ले पोलिस पाटील जगदीश कलमकर यांना सदर घटनेची माहिती दिली. मात्र हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणारे ते तरुण या मार्गावर कुठं पडले आहे का? याची खात्री करण्यासाठी परत माघारी आले असता त्यांना ते सापडले आणि ओळख पटवून त्यांनी तो मोबाईल त्यांना परत केला.

टाइम्स स्पेशल

महागड्या किंमतीचा असलेला मोबाईल श्रीकृष्ण पेंडसे यांनी परत करत एक आपुलकीची भावना जपली. तर ज्यांचा मोबाईल हरवला होता तो त्यांना मोबाईल परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेह-यावर एक वेगळेच हास्य दिसुन आले व त्यांनी पेंडसे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले. जेष्ठ नागरिक कृष्ण पेंडसे यांच्या प्रामाणिक पणाबाबत आंजर्ले परिसरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg