loader
Breaking News
Breaking News
Foto

आडारीत कोंबडी पालनाच्या शेडमधून ३० गावठी कोंबड्यांची चोरी

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील आडारी सातेरी मांड येथील एका कोंबडी पालनाच्या शेडमधून ३० गावठी कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चंद्रकांत जैतापकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार - आडारी सातेरी मांड येथील चंद्रकांत पांडुरंग जैतापकर यांची त्यांच्या घराशेजारीच कोंबडी पालनाचे शेड आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास अज्ञात चोरट्याने या शेडमध्ये प्रवेश केला. चोरट्याने शेडमधील विजेच्या वायर कापून आत असलेल्या एकूण ३० गावठी कोंबड्या चोरून नेल्या. प्रत्येक कोंबडीची किंमत अंदाजे १६० रुपये धरण्यात आली असून ४,८०० रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३२४(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg