loader
Breaking News
Breaking News
Foto

ए.के.आय. दाभोळच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह विद्यार्थ्यांचा गौरव

दाभोळ (वार्ताहर) : ए.के.आय. दाभोळच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जार्फ एमएचओ समूह, दुबई यांच्यावतीने दाभोळ येथे भव्य पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करावी, त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी झाकीर हुसेन चौगले यांचे ज्येष्ठ बंधू हाफिज कलीमुद्दीन चौगले, पत्नी मेहजबीन चौगले तसेच चिरंजीव उमर चौगले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हाफिज कलीमुद्दीन चोगले यांच्या पवित्र कुराण पठणाने करण्यात आली. उमर चोगले यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात दाभोळ परिसरातील डॉक्टर, हाफिज, शिक्षक, समाजसेवक तसेच शाळेच्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सन २०२५ च्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जार्फ एमएचओ समूहाची स्थापना झाकीर हुसेन चौगले यांनी केली असून ते ए.के.आय. दाभोळचे माजी विद्यार्थी आहेत. गरजू व वंचितांच्या सेवेसाठी तसेच आपल्या आई-वडिलांच्या इच्छेला आदरांजली म्हणून या समूहाची स्थापना करण्यात आली आहे. ‘जार्फ’ या अरबी शब्दाचा अर्थ सहनशीलता, मनाची विशालता व जबाबदारी स्वीकारणे असा होतो, तर एमएचओ म्हणजे वैद्यकीय मदत संस्था. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी सुमारे १५० स्मृतिचिन्हांचे वितरण करण्यात आले. सर्वप्रथम दाभोळ परिसरातील डॉक्टरांचा त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी गौरव करण्यात आला. यामध्ये दाभोळच्या पहिल्या महिला डॉक्टर व वर्षभर अखंड सेवा देणाऱ्या डॉ. सबीहा बालाभाई सरखोत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. गझल गायनासाठी स्वालिहा बारगीर, कव्वाली ‘काली काली जुल्फे’ साठी ताल्हा दर्वेश, सादिम नाखवा व मुआझ मुजावर, नात गायनासाठी अहमद बामणे, नाटक ‘अनपढ नेताजी’ साठी अरहान सोलकर व अनस बामणे, नाटक ‘बेटियों की अहमियत’ साठी जोहा फडणीस व सारा मुजावर, ‘मुगल-ए-आझम’ कव्वालीच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी आफिया दर्वेश यांना सन्मानित करण्यात आले. कोकणी नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी तैमिना दर्वेश हिला सर्वोत्कृष्ट कलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे नाटक अफरीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले होते.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी शाळेला स्मृतिचिन्हांसह मुख्याध्यापक फजलुद्दीन बामणे यांनाही विशेष स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकवृंदाचा विशेष सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मेहजबीन चौगले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना व उपस्थित पाहुण्यांना मिठाई वाटप करण्यात आले. सर्वार्थाने हा सन्मान सोहळा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफरीन शेख व मुजम्मील खतिब यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg