loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात सी.बी.एस.ई बोर्ड - सी.ओ.ई. पुणे मार्फत शिक्षक प्रशिक्षण उत्साहात

खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथे रविवार दि. २७ डिसेंबर आणि २८ डिसेंबर २०२५ रोजी सी.बी.एस.ई. बोर्ड (नवी दिल्ली) - सी.ओ.ई. पुणे मार्फत शिक्षक प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली यांनी या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक प्राचार्य डॉ. गौरव नंदकिशोर तिवारी (पी.पी.गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खोपोली) व किरण हरिश्चंद्र दरेकर (ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे, बोरज) यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. गौरव तिवारी व किरण दरेकर यांनी शिक्षकांना विविध उपक्रमातून आपल्या मूल्यांकन आणि मूल्यांकन मजबूत करण्यासाठी, रोट लर्निंगच्या पलीकडे जाऊन समग्र, क्षमता-आधारित मूल्यांकनाकडे लक्ष केंद्रित करणे, शिक्षकांना कार्यशाळांद्वारे संतुलित मूल्यांकन तयार करण्यासाठी, रूब्रिक्स तयार करण्यासाठी आणि चांगल्या विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी डेटा वापरण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामध्ये वास्तविक जीवनातील अनुप्रयोग आणि कौशल्य विकासावर भर देणे तसेच विविध प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन कसे करावे?, शिस्त, प्रगतीपुस्तक लेखन याचे प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन केले. श्री समर्थ कृपा विद्यालय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच कार्यरत असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता अध्ययन-अध्यापनामध्ये सतत बदल होत असतात. या मूल्यांकनांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यास, सुधारण्यासाठी विविध क्षेत्र ओळखण्यास आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक निर्णयांची माहिती देण्यास मदत होते.

टाईम्स स्पेशल

या दोन दिवसीय प्रशिक्षणातुन मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणामध्ये उमे खादीजा इंग्लिश मीडियम स्कूल विसापूर (दापोली), एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल (चिपळूण) ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल (खेड) , रिगल स्कुल (चिपळूण) व श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल (वेरळ) या शाळांमधील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे आयोजन संचालक डॉ. एस.एस.अली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सहाय्यक भक्ती घडशी यांनी डिजिटल तंत्रज्ञान यांच्या सहकार्याने सत्राचे प्रभावीपणे समन्वय साधले. शाळेचे शिपाई कर्मचारी संतोष नेवरेकर आणि अजय जाधव यांनी व्यवस्था काळजीपूर्वक सांभाळली. सदर प्रशिक्षणाला प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिनाक्षी आंब्रे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg