loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये वाजत गाजत जल्लोषात नगराध्यक्षपदी माधवी बुटाला विराजमान

खेड (वार्ताहर) - खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत शतप्रतिशत यश शिवसेना- भाजप महायुतीने संपादन केल्यानंतर सोमवारी नूतन नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांनी उत्साहात आणि भगवामय वातावरणात नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश संपादन करत २१-० अशा फरकाने विजय मिळवला होता. जनतेतून थेट झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सौ. माधवी राजेश बुटाला यांनी घवघवीत विजय मिळवला होता. सोमवार २९ डिसेंबर रोजी त्यांनी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी सौ. श्रेयाताई कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, जिल्हा परिषद माजी सभापती अण्णा कदम, भाजप नेते व माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह खेड शहरातील नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी खेड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. माधवी बुटाला यांना जल्लोषात नगरपरिषद कार्यालयात आणण्यात आले. नगरपरिषद आवारात त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष सौ. माधवी बुटाला म्हणाल्या की, आज मिळालेला हा विजय माझा नसून संपूर्ण खेडवासियांचा आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि कदम परिवारासह सर्व खेडवासियांनी मिळून हा विजय मिळवला आहे. या विश्वासाला पात्र ठरत खेड शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल. खेड शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्याचा माझा संकल्प आहे. महायुतीच्या या ऐतिहासिक २१-० विजयामुळे खेडच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg