loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई महानगर पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी; सुतार, वाडकर, फणसे, सावंत...कोणाकोणाला संधी?

मुंबई - मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आतापर्यंत कुठलीही यादी जाहीर केलेली नाही. मात्र आतापर्यंत 90 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यातील 55 जणांची नावे समोर आली आहेत. राज आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे भावांनी 24 डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता 'ठाकरे बंधू विरुद्ध महायुती' असा थेट सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) एकत्र लढणार आहे. त्यामुळं या निवडणुकीत बहुमताचा म्हणजेच 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार, २) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे, ३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड, ४) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर, ५) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर, ६) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे, ७) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील, ८) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर, ९) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार, १०) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू, ११) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे, १२) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे, १३) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने, १४) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत, १५) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी, १६) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर, १७) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान, १८) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे, १९) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत, २०) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे, २१) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री, २२) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर, २३) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे, २४) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत, २५) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर, २६) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव, २७) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे, २८) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे, २९) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख, ३०) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार, ३१) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले, ३२) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील, ३३) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे, ३४) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते, ३५) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू, ३६) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे, ३७) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर, ३८) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे, ३९) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे, ४०) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे, ४१) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे, ४२) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर, ४३) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर, ४४) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर, ४५) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले, ४६) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके, ४७) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे, ४८) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड, ४९) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ, ५०) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे, ५१) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर, ५२) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ, ५३) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर ५४) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर, ५५) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक

टाइम्स स्पेशल

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026 मतदान- 15 जानेवारी 2026 मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026 2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक शिवसेना- 84, भाजपा- 82, काँग्रेस- 31, राष्ट्रवादी काँग्रेस- 9, मनसे- 7, समाजवादी पक्ष- 6, एमआयएम- 2, अपक्ष- 5

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg