loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत रंगणार अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धेचा थरार

रत्नागिरी - उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धेचा थरार ३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नाचणे येथील शिवरुद्र टर्फवर रंगणार आहे. रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी ’क्रिस्टल ग्रुप’च्या वतीने ’क्रिस्टल चषक २०२६’ ही भव्य क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. भव्यदिव्य अशा या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. ३) दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील दिग्गज क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत दिमाखात पार पडणार आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच क्रिकेट प्रेमींसाठी क्रिस्टल ग्रुपने क्रीडा मेजवानी उपलब्ध करून दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीच्या क्रिकेट इतिहासात मोलाचे योगदान देणारे मान्यवर खेळाडू उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मुंबईच्या सेंट्रल रेल्वेकडून रणजी खेळलेले आणि ७० व्या वर्षीही कोचिंग देणारे हरिष लाडे, रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव दिपक मोरे, ’यंगबॉईज’चे हुकमी फलंदाज सुरेश जैन, जिल्ह्याचे वेगवान गोलंदाज सईद मुकादम, अष्टपैलू खेळाडू दिवाकर मयेकर आणि महिला क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या योगिता महाकाल यांचा समावेश आहे. या ज्येष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीमुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रशिक्षक आणि प्रसिध्द क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी क्रिस्टल चषक स्पर्धेला व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. हे या स्पर्धेचे वैशिष्ठ्‌य आहे. ढशपपळीउीळलज्ञशीं.ळप यावर या स्पर्धेतील सर्व सामने लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असो.ची पंच परीक्षा दिलेले पंच असणार आहेत. रविवारी (ता. ४) सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीतील महिलांच्या दोन संघात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात येणार आहे. श्री साई स्पोर्टस् आणि अश्वमेध क्रिकेट ऍकॅडमी यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला राजेश सोहोनी आणि कंपनी तसेच एंजल ब्रॉकिंग्सकडून विशेष ट्रॉफीस मिळणार आहेत.

टाइम्स स्पेशल

रत्नागिरीतील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि क्रिकेटचा दर्जा उंचावा या उद्देशाने क्रिस्टल ग्रुपने या स्पर्धेचे नेटके नियोजन केले आहे. शिवरुद्र टर्फ, शांतीनगर (नाचणे) येथे होणार्‍या या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. विजेत्या संघांना भरघोस रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक देण्यात येणार असून विजयी संघ : २५,५५५ रुपये व चषक, उप विजयी संघ ः १५,५५५ रुपये व चषक, मॅन ऑफ दि सीरिज ः रोख २,५५५ रुपये आणि चषक, बॅट, ब्लूटूथ स्पीकर. इतर वैयक्तिक बक्षिसे : सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला प्रत्येकी १,१११ रुपये व चषक, प्रत्येक सामन्यात ’मॅन ऑफ दि मॅच’ चा पुरस्कार, स्पोर्ट जर्कीन आणि रत्नविहार गिफ्ट हॅम्परचे नियोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg