loader
Breaking News
Breaking News
Foto

सब-ज्युनिअर तायक्वांडो अजिंक्यपद राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गणराज क्लबची बरखा संदे हीची निवड

रत्नागिरी : तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत आयोजित सब-ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गणराज क्लबच्या कुमारी बरखा सर्फराज संदे हिची निवड झाली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा वासुदेव हॉल, उद्यमनगर, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत, ज्यात बरखा संदे 'क्योरोगी' प्रकारात आपले कौशल्य सिद्ध करेल. रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने यापूर्वीही राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता बरखाच्या रूपाने जिल्ह्याची मान पुन्हा उंचावण्याची संधी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बरखा संदे हिला आंतरराष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री. प्रशांत मनोज मकवाना आणि महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या यशात तिच्या आई-वडिलांचाही मोलाचा वाटा आहे. बरखाच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिदें, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना देसाई यांनी तिला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

याशिवाय नगराध्यक्षा सौ. शिल्पा ताई सुर्वे, नगरसेवक सौ.पूजा पवार, सौरभ मलुष्टे, गणराज क्लबचे पदाधिकारी (अध्यक्ष सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूंळा), तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे आणि महासचिव मिलिंद पठारे यांच्यासह अन्य पदाधिकारी, प्रशिक्षक आणि पालकवर्गानेही बरखाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg