loader
Breaking News
Breaking News
Foto

थेट जनतेमधून निवडून आलेल्या लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पदभार स्वीकारणार

लांजा (संतोष कांबळे) :- लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेमधून नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या शिवसेना (शिंदे)पक्षाच्या विजयी उमेदवार सावली सुनिल उर्फ राजू कुरूप या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवनिर्वाचित नगराध्यक्ष सावली सुनिल कुरूप यांच्या सत्तारोहणाची जय्यत तयारी लांजामध्ये सुरू आहे. नगरपंचायत प्रशासनाने आपल्या पद्धतीने सर्व नियोजन केले आहे. मुख्य बाजारपेठेत असलेल्या नगरपंचायतीच्या मुख्यालयासमोर भव्य शामियाना उभारण्यात आला असून त्याच ठिकाणी नव्या नगराध्यक्ष सावली सुनिल कुरूप लांजा शहरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

टाइम्स स्पेशल

या भव्य कार्यक्रमाला आमदार किरण सामंत हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. लांजे गावातील देवदेवतांचे दर्शन घेऊन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.सावली सुनिल कुरूप या आपल्या विजयी नगरसेवकांसह मिरवणुकीने नगरपंचायतीपर्यंत येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg