loader
Breaking News
Breaking News
Foto

महायुतीला मोठा तडा! एकदोन नव्हे, तब्बल 5 महापालिकांमध्ये युती तुटली; शिवसेना- भाजपात होणार लढत

मुंबई - उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू असताना आणि पक्षश्रेष्ठी थेट निवडणूक व्यवस्थापनात उतरले असतानाच सत्तेत असलेल्या महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक ठिकाणी तीव्र मतभेद उफाळून आले असून, एक-दोन नव्हे तर तब्बल 5 महापालिकांमध्ये महायुती फिस्कटली आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अपेक्षेच्या विरुद्ध एकमताचं वातावरण दिसत असताना, सत्ताधारी महायुतीत मात्र अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. जागावाटप, उमेदवार निवड आणि स्थानिक नेतृत्वाच्या आग्रहमुळे युती टिकवणं अशक्य झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महायुती होणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी अधिकृत वक्तव्य करत युती तुटल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. स्थानिक नेत्यांच्या आग्रहमुळे आणि जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावामुळे युती फिस्कटल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे संभाजीनगरमध्ये आता थेट भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुणे महापालिकेतही महायुती तुटल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, उमेदवारी वाटपात शिवसैनिकांना डावलल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे.

टाइम्स स्पेशल

उल्हासनगर महानगर पालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती अस्तित्वात असली, तरी उल्हासनगरमध्ये मात्र ही महायुती अखेर तुटली आहे. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते महायुती कायम ठेवण्यासाठी आग्रही होते, मात्र स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकले नाही. पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही महायुती टिकेल का? यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत हे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेणार असून, त्यानंतरच युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र सध्याचं वातावरण पाहता पिंपरी-चिंचवडमध्येही युती तुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. माहितीनुसार नवी मुंबईसह आणखी काही महापालिकांमध्ये भाजप–शिवसेना युतीत तणाव असून, एकूण 5 महापालिकांमध्ये महायुती स्वबळावर लढण्याच्या भूमिकेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. एबी फॉर्मचं वाटप सुरू झाल्याने युतीची शक्यता संपुष्टात आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg