loader
Breaking News
Breaking News
Foto

विरार-भातगाव एस.टी.बस सुरु करावी, गुहागर ता. काँग्रेस माजी अध्यक्ष मिलिंद चाचे यांची मागणी

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी भातगाव, आवरे, आबलोली, मासू, पाचेरी, कोळवली, मोंभार, असोरे, या गावातील विरार, नालासोपारा, वसई, विरार, ठाणे, याठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या जनतेसाठी विरार - भातगाव ही विरार आगारची नवीन एस. टी.बस सुरु करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नाम. प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागचे व्यवस्थापकीय संचालक महादेव कुसेकर यांना निवेदनद्वारे केली आहे. विरार-भातगाव एसटी बस सुरू होण्यासाठी मिलिंद चाचे हे प्रयत्नशील आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली 5 वर्ष मिलिंद चाचे यांनी गणपती उत्सव, होळी उत्सवसाठी ज्यादा गाडी मंजूर करून घेतल्या आहेत. काही दिवसापूर्वी कुडली-अक्कलकोट ही बस ही मिलिंद चाचे यांच्या प्रयत्नमधून सुरु झाली होती आणि आता त्यांनी विरार-भातगाव ही विरार डेपोची बसची मागणी केली आहे आणि येत्या काही दिवसात ही बस, भातगाव, पाचेरी, मोबार, असोरे, कोळवली मासू आणि आजूबाजूच्या गावातील जनतेसाठी उपलब्ध होईल, असे मिलिंद चाचे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg