loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेबांबर-उसप रस्ता खड्डेमय; निवेदन देऊन दखल नाही, ठाकरे महिला पदाधिकारी यांचे गटविकास अधिकारी यांच्या दालनात बैठे आंदोलन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - झरेबांबर उसप हा प्रमुख मार्ग गेल्या अनेक महिन्यापासून खड्डेमय अवस्थेत असून वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धूरून प्रवास करावा लागत असुन येत्या ७/१२/२०२५ पर्यंत पूर्ण रस्त्याचे खड्डे न बुजवल्याने आंदोलन करू असे लेखी निवेदन दोडामार्ग पंचायत समिती कार्यालय येथे देऊन देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा संबंधित ठेकेदार याला खड्डे बुजवायला लावले नाही. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे शिवसेना महिला पदाधिकारी यांनी मंगळवारी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या दालनात बैठे आंदोलन सुरू केले. खड्डे बुजवायला घ्या अशी मागणी केली. यावेळी गटविकास अधिकारी उपस्थित नव्हते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर ते उसप, पिकुळे, हा रस्ता अनेक खड्डे पडून मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता होईल तेव्हा होईल तोपर्यंत खड्डे बुजवायला घ्या, असे निवेदन ठाकरे शिवसेना महिला उप जिल्हा प्रमुख विनिता घाडी यांनी दिले होते. पण प्रशासकीय अधिकारी यांनी दखल घेतली नाही. यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत, असा आरोप केला. दोडामार्ग पंचायत समितीकडून हा रस्ता आराखड्यात घेतला आहे. काम होईल असे सांगितले जाते पण रस्ता होईपर्यंत पडलेले खड्डे डांबरीकरण करा अशी मागणी केली पण लक्ष दिले नाही त्यामुळे शिवसेना महिला पदाधिकारी विनिता घाडी, जेनिफर लोबो , सौ.शेटकर, यांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात खड्डे बुजवायला घ्या, यासाठी बैठे आंदोलन सुरू केले. दोडामार्ग पंचायत समिती कडून वेळीच खड्डे बुजवायला घेतले नाही तर ५ जानेवारी रोजी खड्डयात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg