loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात दसपटी चिपळूण तर महिला विभागात रत्नागिरी तालुका संघ विजयी

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाली युवा मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात दसपटी क्रीडामंडळ चिपळूणने तर महिला विभागात रत्नागिरी तालुका महिला संघाने विजेतेपद पटकावले. पाली येथे झालेल्या स्पर्धेतील अनेक सामने अतितटीचे झाले. ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी मोठी गर्दी केली होती. लांजा-राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याहस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. पाली युवा मंचाच्यावतीने अनेक उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात पुरुष गटात १६ तर महिला गटात ४ संघ सहभागी झाले होते. पुरुषांचा अंतिम सामना रंगतदार झाला. अंतिम सामन्यात दोन्ही संघ चिपळूण तालुक्यातील एकमेकांविरोधात उभे होते. दसपटी क्रीडामंडळाने चिपळूणमधील गुरुकुल संघावर चार गुणांनी मात करीत विजेतेपद पटकावले. तृतीय क्रमांक चिपळूणच्या संघर्ष क्रीडामंडळाने तर चतुर्थ क्रमांक रत्नदीप क्रीडामंडळ मिरजोळे रत्नागिरी यांनी पटकावला.

टाइम्स स्पेशल

अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार शुभम कदम याने, अष्टपैलू खेळाडू अभि शिंदे, उत्कृष्ट पकड निलेश व आकाश शिंदे, उत्कृष्ट चढाई शुभम कदम यांना गौरवण्यात आले. महिला विभागात रत्नागिरी तालुका महिला संघाने लांजा तालुका महिला संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. अष्टपैलू खेळाडूचा मान मैथिली गावकर आणि उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार स्वरा भाटकर हिला देऊन गौरवण्यात आले. विजेत्यांना संघांना लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी पाली युवा मंचचे अध्यक्ष अमेय वेल्हाळ, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, युवासेनेचे मुन्ना देसाई, जिल्हा बँक संचालक रामभाऊ गराटे, उपसरपंच संतोष धाडवे, हातखंबा विभागप्रमुख तात्या सावंत, गणेश चव्हाण, नंदराज कुरुप, मुन्ना खामकर, योगेश वाघधरे, नेताजी पाटील, शेखर सुर्वे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg