loader
Breaking News
Breaking News
Foto

वनविभागाच्या दुर्लक्षाविरोधात सरपंच व शेतकरी रस्त्यावर; ५ जानेवारीला ठिय्या आंदोलन

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यात हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत सरपंच सेवा संघ व शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर ५ जानेवारी रोजी दोडामार्ग वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील हत्तीबाधित गावांमध्ये सतत नुकसान होत असतानाही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप सरपंच सेवा संघाने केला आहे. यापूर्वी झालेल्या बैठकींमध्ये मांडलेल्या मागण्यांवर कोणतीही प्रभावी कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सरपंच सेवा संघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रविण नारायण गवस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हत्ती उपद्रव रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना, बाधित शेतकऱ्यांना तातडीची भरपाई तसेच गावपातळीवर ठोस नियोजन करण्याची गरज आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या परिस्थितीत ५ जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी वनविभाग प्रशासनाची राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असून प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg