loader
Breaking News
Breaking News
Foto

हेदवी ग्राम संस्था मुंबई (रजि.) या संस्थेच्या अध्यक्षपदी उच्च शिक्षित तरुण कार्यकर्ते प्रदीप हळदणकर यांची बिनविरोध निवड

आबलोली (संदेश कदम) - हेदवी ग्राम संस्था मुंबई या संस्थेची स्थापना हेदवी गावातील तत्कालीन समाज धुरिणांनी सन १९२५ साली केली. गावाचा सर्वांगीण विकास हे ध्येय मनाशी बाळगून गावामध्ये एस. टी.बस सुविधा, पोस्ट ऑफिस, वाडीवाडीत दिवा बत्तीची सोय, पक्के रस्ते, गावात ग्रामपंचायत या बरोबरीने माध्यमिक शिक्षणाची आणि प्राथमिक आरोग्य सुविधा या महत्त्वाच्या बाबी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. संस्थेच्या या प्रदीर्घ शतकीय वाटचालीमध्ये हेदवी गावातील प्रसिद्ध उद्योगक स्व. हेदवकर बंधू, श्री दशभुज लक्ष्मी गणेशाचे परम भक्त उद्योजक कै.शिवराम गोविंद तथा काकासाहेब जोगळेकर, मुंबईतील साईन हॉस्पिटलचे माजी डीन कै.डॉ. श्रीकृष्ण जोगळेकर, कै. डॉ. दामोदर जोगळेकर, हेदवी ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच कै.श्रीराम वासुदेव तथा रामभाऊ जोगळेकर, कै.विश्राम वणे, कै.शांताराम तांबे, कै.प्रमोद मोरे, कै. पी. एस. गुरव, कै. अशोक बाळकृष्ण भाटकर, कै.अर्जुन पांडुरंग तथा नाना हेदवकर आदी. ग्रामस्थ मान्यवरांचे बहुमूल्य योगदान लाभले आहे. या व्यतिरिक्त माजी आमदार कै. डॉ. श्रीधर नातू, हेदवी गावच्या माहेरवाशीण मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू कै.डॉ. स्नेहलता ताई देशमुख, कै. मोतीराम वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले असून स्थानिक आणि मुंबईस्थित अनेक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही संस्था मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्या निकेतन हेदवी या हायस्कूल ची व्यवस्था आणि देखभाल करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडीत आहे. या संस्थेचे अध्यक्ष अर्जुन पांडुरंग हेदवकर यांचे आकस्मितपणे दुःखद निधन झाल्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष संजय सदानंद गुढेकर हे जबाबदारी सांभाळीत होते. या रिक्त पदावर शुक्रवार दिनांक २८ डिसेंबर, २०२५ रोजी कुणबी समाज्योन्नती संघ मुंबई, वाघे हॉल, परळ, मुंबई येथे संस्थेचे हंगामी अध्यक्ष संजय सदानंद गुढेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये उच्चशिक्षित तरुण कार्यकर्ते प्रदीप श्रीधर हळदणकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

या सभेला संस्थेचे चिटणीस कृष्णा विश्राम वणे, खजिनदार अजय रघुनाथ चव्हाण, स्थानिक दक्षता कमिटी प्रमुख अभयशेठ भाटकर, लक्ष्मण दत्ताराम मोहिते, सुरेश कृष्णा रामाणे, महादेव विश्राम वणे, डॉ. गजानन जोगळेकर, शिवप्रसाद हळदणकर, मिलिंद पाटेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष म्हणून तरुण वयात मिळालेली जबाबदारी उच्चशिक्षित प्रदीप श्रीधर हळदणकर चांगल्या तऱ्हेने पार पडतील याची हेदवी गावातील ग्रामस्थांनी खात्री बाळगून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg