loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली शाळा नं. १ व अंगणवाडी मराठवाडी येथील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.१ च्या शतक महोत्सव कार्यक्रमानिमित्त वरवेली शाळा नं.१ व अंगणवाडी मराठवाडी येथील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेच्या रंगमंचावर सादर करण्यात आला. यावेळी शतक महोत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र विचारे, वैभव पवार, जितेंद्र विचारे, आशिष विचारे, राजेंद्र विचारे, चंद्रकांत विचारे, गणेश किर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल रांजाणे, उपाध्यक्षा धनश्री चांदोरकर, मनस्वी किर्वे, शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे, अर्चना वाकडे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, मदतनीस अस्मिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमांमध्ये वरवेली तेलीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळ यांनी शाळेला सतरंजी भेट दिली. जिल्हा परिषद वरवेली शाळा नं.१ व अंगणवाडी मराठवाडी येथील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा, उत्साहवर्धक आणि आनंददायी वार्षिक कार्यक्रम असतो. जिथे गायन, नृत्य, नाटिका, यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थी आपली कला सादर करतात. शिक्षक-पालक एकत्र येतात आणि शाळा-घरातील नाते घट्ट होते. यातून सर्वांनाच आनंद मिळतो व शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर दीप नृत्य, अंगणवाडी वरवेली मराठवाडी येथील विद्यार्थ्यांचे नृत्य, गणपतीनृत्य, मंगलागौर, भूपाळी, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, शिवकन्या, रिमिक्स, मराठमोळी लावणी, नाटिका, खंडोबा रायाची जेजुरी, वारकरी नृत्य, जाखडी, गोंधळ व देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर, शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे, अर्चना वाकडे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, अंगणवाडी मदतनीस अस्मिता पवार यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शतक महोत्सव समिती, पालक व विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ मुंबईकर यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg